कुठल्याही नदीचं आपल्या आयुष्यात खूप महत्व असतं. हिंदू धर्मात मरणानंतर देखील प्रत्येक गोष्ट नदीशी निगडित आहे. नदीच्या अंतरंगातल्या कित्येक गोष्टी काळात नाहीत. नदीकिनारी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो. कोणाला शांत, संथ वाटेल, कोणाला कचरा बघून घाण वाटेल पण नदी संथपणे वाहत असते सगळ्या गोष्टी पोटात घेऊन ते पण वर्षानुवर्षे. प्रत्येकाचा नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ‘गोदावरी’ चित्रपट बघताना असाच अनुभव येतो.

निशिकांतच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या दोन गोष्टी समोर येतात. यातून त्याला जाणवतं कि कुठल्या त्याने केलेल्या चुकांमुळे तो आयुष्यात काय गमावत आहे. त्याचे घरच्यांबरोबरचे संबंध सुधारतात का आणि या बदल घडवणाऱ्या गोष्टींचे परिणाम चित्रपटात बघण्यात मजा आहे.

जितेंद्र जोशी च्या व्यक्तिरेखा खूप चांगली लिहिली आहे आणि त्यांनी घेतलेली मेहनत अभिनयातून दिसून येते. One of his best performances असा नक्कीच म्हणता येईल. गौरी नलावडे अप्रतिम. विक्रम गोखलेंना खूप वर्षांनी पडद्यावर बघून छान वाटते. संजय मोनेंचा डोळ्यातून दिसणारा अभिनय अप्रतिम. वडील मुलाच्या नात्यातील न सांगता येणारे प्रसंग त्यांनी छान सादर केलेत. प्रेमळ आई च्या भूमिकेत नीना कुलकर्णींचा हातखंडा आहेच. प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर यांची कामे लक्षात राहतात.

निखिल महाजन चे चित्रपट वेगळे असतात. त्याची स्वतःची वेगळी शैली आहे. या चित्रपटात त्यांच्यातला दिग्दर्शक डोकावतो. गोदावरी किनारी झालेले चित्रीकरण मोठ्या पडद्यावर सुंदर दिसते. संगीत आणि पार्श्वसंगीताबद्दल ए वी प्रफुल्लचंद्र यांचे विशेष कौतुक. चित्रपट संपल्यानंतर पण त्यातले काही संवाद लक्षात राहतात त्यासाठी विशेष कौतुक. जसे आपल्या रूढी परंपरा या संथपणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवल्या जातात तसेच हा चित्रपट काही ठिकाणी संथ वाटू शकतो पण हा विलक्षण अनुभव चित्रपटगृहात घ्यायलाच पाहिजे. असा चित्रपट बनवण्यासाठी निखिल, जीतु आणि सर्व टीमचे अभिनंदन.

Write a comment

Your email address will not be published. Required fields are marked *